मातंग समाजाने ‘ या ‘ मागणीसाठी काढला महामोर्चा


0
Views

मातंग समाजाने ‘ या ‘ मागणीसाठी काढला महामोर्चा

सोलापूर, दि. 9- अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे तातडीने उपवर्गीकरण करून आरक्षणाचे लाभ समन्यायी पद्धतीने वितरित करावेत, तसेच अनुसूचित जातींचे ‘प्रगत’ आणि ‘वंचित’ असे दोन गट करावेत, अशी प्रमुख मागणी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य, शाखा सोलापूरच्या वतीने आज बुधवारी काढण्यात आलेल्या महामोर्चातून करण्यात आली.

 

 

 

सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणाबाबत दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने विलंब न करता उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अनुसूचित जातींच्या अंतर्गत असलेली विषमता दूर करून आरक्षणाचा लाभ खऱ्या अर्थाने वंचित घटकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, अशी भूमिका मोर्चातील नेत्यांनी मांडली.

 

 

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून महामोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन जिल्हापरिषद पूनम गेट येथे मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले.

 

 

 

या मोर्चाला माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार अविनाश घाटे, रमेश कदम, विजय अंभोरे, सुकुमार कांबळे, प्रा. मच्छिंद्र सकटे, सचिन साठे, विष्णू कसबे, गणपत भिसे, अजिंक्य चांदणे, शंकर तडाखे, अनिल हातागळे, भास्कर नेटके, अशोक लोखंडे, जोशीला लोमटे यांच्यासह माजी कॅबिनेट मंत्री प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे आणि माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांचे नेतृत्व लाभले.

 

 

 

महामोर्चाच्या यशस्वीतेसाठी अभिजीत ढोबळे, सुहास शिंदे, सुरेश पाटोळे, गोविंद कांबळे, साक्षात लोखंडे, महादेव भोसले, पृथ्वीराज मोरे, समाधान आवळे, उमेश काळे, बंडू गवळी, रोहित खिलारे, विकास कसबे, विश्वास शिंदे, शांतीलाल साबळे, खंडू बनसोडे, अनिल बनसोडे, रोहन लोंढे, विजय अडसूळे, लखन गायकवाड, वैशाली डोलारे, संजय साठे, किशोर जाधव, प्रा. परमेश्वर हटकर, टी. एस. क्षीरसागर, डॉ. प्रा. दिगंबर झोंबाडे, प्रा. मारुती घंटवाडे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *