0
Views

विमान उडाले.. उडाले.. बंद पडले.. बंद पडले..
विमानसेवा बंद पडल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे आंदोलन
सोलापूर, दि. 9- पोकळ आश्वासन देऊन वारंवार सोलापूरात विमानसेवा बंद करणार्या भाजप सरकारच्या विरोधात सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखालील विमानतळ गेट समोर कागदी विमाने उडवून निदर्शन करत आंदोलन करण्यात आले. यावेळी विमान उडाले.. उडाले.. बंद पडले.. बंद पडले.. असे म्हणत उपहासात्मक टीका करण्यात आली.
या आंदोलनात प्रतिकृती विमानावर पंतप्रधान, पालकमंत्री, केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री, राज्यमंत्री यांचे फोटो लावून भाजप सरकारच्या विरोधात विमान सेवा चालू करा, भाजप सरकार मुर्दाबाद, पालकमंत्री मुर्दाबाद अशी विविध घोषणाबाजी करत कागदी विमान उडवून युवक काँग्रेसने परिसर दणाणून सोडला.
यावेळी सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे म्हणाले विधानसभा, महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर घाईगडबडीत सोलापूर विमानतळाचे उदघाटन केंद्रीय नागरी राज्यमंत्री व पालकमंत्र्याच्या हस्ते मोठया थाटात करण्यात आले. विमानसेवेच्या नावावर मते मागून महानगरपालिकेत सत्ता मिळवली. विमानसेवा चालू करण्यासाठी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडून हजारो कुटुबांची घरे भाजप सरकारने उध्वस्त केली.पंरतू वारंवार विमानसेवा चालू बंद चालू बंद करून आज पुर्णपणे विमानसेवा बंद केली. पोकळ आश्वासन देऊन वारंवार सोलापूरात विमानसेवा बंद करून व सोलापूरची दिशाभूल करणार्या पालकमंत्री व भाजप सरकारचा धिक्कार युवक काँग्रेसच्या वतीने करतो.
यावेळी युवक काँग्रेस उपाध्यक्ष सचिन पवार, विनोद पाटील, धीरज खंदारे, सुशिलकुमार म्हेत्रे, योगेश रणधीरे, विवेक इंगळे, अब्दुल हाफीज मुल्ला, प्रतीक शिंगे, चंद्रकांत नाईक, यासीन शेख, सोपान मिसाळ, अमोल माशाळे, कृष्णा नाईक, दिनेश डोंगरे, आरिफ मकानदार, अभिजीत गायकवाड, अभिषेक पवार, कुणाल राठोड, श्रीनिवास मदरी, विलास राठोड, कृष्णा राठोड, संदेश गायकवाड, गणेश शासम, अजीम शेख, साहिल मुल्ला, तौसिफ़ शेख, सिद्धार्थ पाटील, विजय कटकधोंड, योगेश गंगदे, अजय राजमाने आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















Leave a Reply