खासदार प्रणिती शिंदे यांचे ठिय्या आंदोलन सुरू 


0
Views

खासदार प्रणिती शिंदे यांचे ठिय्या आंदोलन सुरू

सोलापूर, दि. 7- येथील लोकसभेच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शेतकऱ्यांना सलग 8 तास वीज पुरवठा सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

 

मागील आठवड्यापासून अचानक बदललेली लाईटची वेळ, वाढलेली लोड शेडिंग व लाईटच्या समस्येबाबत खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी एम एस ई बी कार्यालय, जुनी मिल कंपाऊंड, मुरारजी पेठ सोलापूर येथे धडक मोर्चा काढला आहे. यावेळी आपले म्हणणे मांडताना खासदार प्रणिती शिंदे या चांगल्याच आक्रमक झाल्याचे पहावयास मिळत आहे. त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले असून काँग्रेसचे अन्य नेते व कार्यकर्ते त्यांच्यासोबत आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *