0
Views

भाजप ग्रामीण पूर्व जिल्हा कार्यकारिणीची
अक्कलकोट येथे बैठक
अक्कलकोट, दि. 5- येथे भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पूर्व जिल्हा कार्यकारिणीची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यावेळी आगामी संघटनात्मक कार्य, पक्षाची ध्येयधोरणे तसेच विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस जिल्हा प्रभारी तसेच भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर, पश्चिम महाराष्ट्राचे कार्यालयीन प्रमुख योगेश बाचल, आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, प्रदेश संयोजक विक्रम देशमुख, जिल्हा चिटणीस विकास वाघमारे, संतोष मोगले, प्रदीप पाटील, प्रदेश कार्यकारिणीचे जोजन, सुरवसे, सभापती रामाप्पा चिवडशेट्टी, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष महेश बिराजदार यांच्यासह सर्व मंडलाध्यक्ष, चिटणीस, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, सभापती, उपसभापती, किसान मोर्चाचे पदाधिकारी तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.















Leave a Reply