सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या  रक्तदान शिबीरात 85 जण सहभागी 


0
Views

सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या 

रक्तदान शिबीरात 85 जण सहभागी 

सोलापूर, दि. 4- येथील काँग्रेस भवनात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात 85 जणांनी सहभाग नोंदविला.

 

या रक्तदान शिबीराचे उदघाटन माजी आमदार प्रकाश यलगुलवार, सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे,माजी महापौर संजय हेमगड्डी, आरिफ शेख, सुशिला आबुटे, बाबा मिस्त्री, नगरसेवक नरसिंह आसादे, आयोजक गणेश डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

 

यावेळी गणेश डोंगरे म्हणाले सुशिलकुमार शिंदे यांनी सोलापूरचे नाव संपूर्ण देशभरात गाजवले आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे. सोलापूरच्या विकासामध्ये महत्वाचे देशात पहिल्यांदाच स्वतंत्र जिल्हासाठी सोलापूर विद्यापीठ,एन टी पी सी, उजनी दुहेरी पाईप लाईन, डाळिंब संशोधन केंद्र, राज्याला सोलापूरला जोडणारे मोठे रस्ते, पावरग्रेड इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट, सोलापूर सायन्स सेंटर, कुंभारी मेडीकल कॉलेज, बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे विविध प्रकल्प आणून सोलापूरच्या भविष्याचा विचार फक्त शिंदे यांनी केला.

 

यावेळी सेवादल अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे, सोशल मिडीया प्रमुख तिरूपती परकीपंडला, सिध्दाराम चाकोते, शकील मौलवी, पशुपती माशाळ, हाजीमलंग नदाफ, एन के क्षीरसागर, अंबादास गुत्तीकोंडा, नुरअहमद नालवार, हेमा चिंचोळकर, कमरूनिस्सा बागवान, ज्योती गायकवाड, मुमताज तांबोळी, रेखा बिनेकर, छाया हिरवटे, प्रवीण जाधव, योगेश रणधीरे, विवेक कन्ना, सचिन पवार, धीरज खंदारे, अनंत म्हेत्रे, महेश लोंढे, शशीकात शेळके, सोपान मिसाळ, यासीन शेख, अस्लम शेख, प्रतीक शिंगे, चंद्रकांत नाईक, ईलाई हलगूर, सुभाष वाघमारे, मलीक नदाफ, आकाश नाईक, युवराज दोडमनी, दिनेश डोंगरे, आकाश जाभंळे, अजीत सिरसट, सर्जेराव फंड, रितेश जाधव, सागर भिसे, विकी आलाट, राहूल काटे, प्रवीण चव्हाण आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *