राहुल गांधी यांची चेतन नरोटे यांनी कुटुंबियांसह घेतली भेट 


0
Views

राहुल गांधी यांची चेतन नरोटे यांनी कुटुंबियांसह घेतली भेट

सोलापूर, दि. 2- संघटन सृजन अभियान अंतर्गत नाशिक येथे आयोजित काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी आपल्या कुटुंबियांसह भेट घेऊन संवाद साधला. राहुलजींचे प्रेम, आपुलकी आणि कार्यकर्त्यांप्रती असलेला विश्वास या भेटीतून पुन्हा एकदा अनुभवता आला, असल्याची प्रतिक्रिया नरोटे यांनी यावेळी व्यक्त केली.

 

नाशिक येथील या दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिरात प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, माजी मंत्री, आमदार, खासदार आणि वरिष्ठ नेते सहभागी झाले. संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांशी संवाद वाढवणे, जनतेच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे लढा देणे आणि आगामी काळात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी या प्रशिक्षणातून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले.

 

समारोपाच्या दिवशी राहुल गांधी यांनी दिवसभर पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांशी संवाद साधत काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक दिशा आणि मार्गदर्शन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *