0
Views

मी मनसेचा पदाधिकारी वा कार्यकर्ता नाही : बेंबळगी
सोलापूर, दि. 2-
भाजपा युवा मोर्चा सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांनी मी मनसेचा पदाधिकारी आहे म्हणून सर्वत्र व्हायरल केले होते. मात्र मी मनसेचा पदाधिकारीही नाही किंवा कार्यकर्ताही नाही असे स्पष्टीकरण सोलापुरातील तरुण कल्पेश बेंबळगी याने एका व्हिडिओद्वारे दिले आहे.
बेंबळगी आपल्या व्हिडिओमध्ये म्हणतो की पुण्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या फोटो शेजारील नरेंद्र मोदी यांचा फोटो अमित ठाकरे यांनी काढायला लावला होता. ते पाहून भाजपा युवा मोर्चाला वाटले की नरेंद्र मोदी यांचा अपमान झाला आहे. त्यामुळे भाजपा युवा मोर्चाने त्यांच्याविरुद्ध मुंबई येथे मोर्चा काढला होता. या गोष्टीत काही तथ्यच नाही. कारण शिवभक्त म्हणून ही गोष्ट प्रत्येकाला अमान्य होती. त्याच गोष्टीला विरोध म्हणून मी व्यक्तिगत त्यांना शिवराय भाषेत टीका केली होती. त्यामुळे कृष्णराज महाडिक यांना सुद्धा माझी ही गोष्ट पटली नाही. यामुळे त्यांनी मला कॉलही केला होता. यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या. तरीसुद्धा भाजपा सोलापूर युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मी मनसेचा पदाधिकारी आहे म्हणून सगळीकडे व्हायरल केले होते. मात्र मी मनसेचा पदाधिकारीही नाही व कार्यकर्ता ही नाही असे स्पष्टीकरण त्याने व्हिडिओद्वारे दिले आहे.















Leave a Reply