0
Views

मराठा सेवा संघाचा 37 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
सोलापूर, दि. 2-
शहराच्या विकासासाठी नगरसेवकपदाची निवडणूक लढविली. नगरसेवक झाल्यानंतर उपमहापौरपदाची जबाबदारी मिळाली आणि संपूर्ण शहराच्या विकासाची जबाबदारी खांद्यावर आली. त्यावेळी मराठा समाजाच्या वतीने झालेला माझा पहिला सत्कार हा माझ्यासाठी प्रेरणादायी ठरला. समाजाच्या या कौतुकातून मिळालेल्या बळामुळे पुढील कार्य करण्याची ऊर्जा मिळाली, अशी भावना उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी व्यक्त केली.
मराठा सेवा संघाच्या ३७ व्या वर्धापनदिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
यावेळी ॲड. संतोष पाटील यांची बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, प्रा. डॉ. जीवन यादव यांना डॉक्टरेट मिळाल्याबद्दल, तसेच मनाली जाधव हिने पुरातत्त्वशास्त्र (Archaeology) विषयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील हे होते.
समाजातील गुणवंतांचा गौरव हीच समाजाच्या प्रगतीची खरी दिशा असून, युवकांनी शिक्षण, प्रशासन, कायदा, संशोधन यांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून समाजाचे नाव उंचवावे, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास एमएसईबीचे कार्यकारी अभियंता नवनाथ चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी दत्तामामा मुळे, सोमनाथ राऊत, प्रकाश ननवरे महेश देवकर, देविदास घुले, हनुमंत पवार, राम माने, आर पी पाटील, विजय पोखरकर, लता ढेरे, अभिजली जाधव, प्रीती कदम, नवनाथ कदम, सुनील हुंबे, आरती काकडे, विजया राऊत, मीनाक्षी जगदाळे, संजय पवार, गोवर्धन गुंड, नितीन चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदाशिव पवार यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मण महाडिक यांनी केले, तर उज्वला साळुंखे यांनी आभार मानले.
















Leave a Reply