शेकडो दिव्यांनी उजळले देगावचे श्री राम मंदिर 

 

शेकडो दिव्यांनी उजळले देगावचे श्री राम मंदिर 

सोलापूर, दि. 24- दररोज काकडा, अभिषेक यांसह विविध धार्मिक कार्यक्रम होणारे उत्तर सोलापूर तालुक्यातील देगाव येथील श्री राम मंदिर आज सायंकाळी शेकडो दिव्यांनी उजळून निघाले होते. निमित्त होते त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव सोहळ्याचे.

 

श्री राम मंदिर देगाव येथे त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली होती. दीपोत्सव सोहळ्याला सुरुवात झाल्यानंतर मंदिर व परिसरात एक वेगळेच उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. एका पाठोपाठ एक असे शेकडो दिवे प्रज्वलीत केल्यानंतर मंदिर परिसर दिव्यांच्या लखलखाटाने उजळून निघाला. या आगळ्या वेगळ्या सोहळ्याने चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. या सोहळ्याचे देगावकरांकडून कौतुक होत आहे.

 

हा दीपोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी शितल राजकुमार भुईटे, मनिषा खंडेराव काळे, महानंदा अनिल मलशेट्टी, अन्नपूर्णा राजकुमार भुईटे, कावेरी हणमंत भुईटे या महिलांनी परिश्रम घेतले. तर खंडेराव रामचंद्र काळे, शामराव हरिपंडित गायकवाड, शामराव बाळासाहेब सावंत, मुरली मारुती हजारे, कान्हा सुदर्शन कोठे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *