वाडिया हॉस्पिटल तर्फे उद्या देगाव येथे  मोफत आरोग्य तपासणी शिबिर

वाडिया हॉस्पिटल तर्फे उद्या देगाव येथे 

मोफत आरोग्य तपासणी शिबिर

सोलापूर, दि. 29- बालाजी अमाईन्स लिमिटेड व एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

हे शिबीर रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा, देगाव येथे होणार आहे.

 

या शिबिरामध्ये एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांमार्फत नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार पुढील उपचारांसाठी वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शनही दिले जाणार आहे.

 

बालाजी अमाईन्स लिमिटेड आणि एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल यांच्या सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा लाभ देगाव व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन बालाजी अमाईन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *