संभाजी ब्रिगेडच्या सोलापूर शहराध्यक्षपदी  वैभव गायकवाड यांची निवड


0
Views

 

 

संभाजी ब्रिगेडच्या सोलापूर शहराध्यक्षपदी

वैभव गायकवाड यांची निवड

राजकारण न्यूज डॉट कॉम

सोलापूर, दि. 31-

येथील संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेची नूतन पदाधिकारी बैठक शासकीय विश्रामगृह मध्ये पार पडली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्या सूचनेनुसार सोलापूर शहराध्यक्षपदी वैभव गायकवाड यांची निवड करण्यात आली.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांच्या हस्ते व संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले.

 

संभाजी ब्रिगेडच्या शहराध्यक्षपदी प्रथमच कैकाडी समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. या निवडीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती, संभाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर उपाध्यक्ष श्रीकांत भोसले, शहर कार्याध्यक्ष शुभम काजळे, शहर संघटक सौरभ जन्मा, शहर सचिव अक्षय कांबळे, शहर प्रसिद्धी प्रमुख शाहिद पटेल, शहर सचिव कुमार गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.

 

यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास, शहराध्यक्ष सुनीता घंटे, मनीषा कोळी, माधुरी चव्हाण, महेश आठवले, राजाभाऊ गायगवळी, सलीम मुल्ला, रियाज शेख, राज कोई, ओंकार कदम, गुंडप्पा जाधव, महादेव जाधव, उपाध्यक्ष प्रकाश डोंगरे, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, इर्शाद नागोरे, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज सय्यद, शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख, विकास नाईकवाडी, प्रतीक गायकवाड, अल्ताफ तांबोळी, अमोल सुर्वे, सुरज मोरे, शुभम गवसने, ओम गवसने, आकाश निकंबे, अजय शिंदे, लखन दळवी, मोहन हजारे, रोहन माने, निरंजन प्रसाद, अभी पठाण, मुस्तफा नदाफ, राजू गायकवाड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *