
माजी सैनिकांसाठी ‘ येथे ‘ नोकरीची संधी
सोलापूर, दि. ९ : सोलापूर जिल्ह्यातील पात्र व इच्छुक माजी सैनिकांसाठी रेल्वे स्थानकांवर पॉईंट्समन पदावर नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. युनिव्हर्सल पर्सनेल सिक्युरिटी ट्रेनिंग अँड अलाइड सर्व्हिसेस, कोल्हापूर या कंपनीमार्फत मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील विविध रेल्वे स्थानकांवर १०० हून अधिक माजी सैनिकांची आवश्यकता आहे. या पदासाठी कमाल वयोमर्यादा ५५ वर्षे असून उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील भिगवण, जेऊर, भाळवणी, कुडूंबवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, होटगी, अक्कलकोट रोड आणि गाणगापूर रोड, तसेच कर्नाटकातील कलबुर्गी व वाडी या रेल्वे स्थानकांवर नियुक्ती करण्यात येणार आहे.
वेतन व कामाचे स्वरूप
या पदासाठी दररोज ८ तास कामाचा कालावधी असून महिन्यातील २६ कामकाजाच्या दिवसांनुसार वेतन पॅकेज निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, कंपनीकडून देण्यात येणारे एकूण वेतन पॅकेज (CTC) २६ हजार ५० रुपये प्रतिमहिना असून, प्रत्यक्ष हातात मिळणारे वेतन २२ हजार १०० रुपये प्रतिमहिना असेल.
सोलापूर जिल्ह्यातील पात्र व इच्छुक माजी सैनिकांनी या रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मिलिंद तुंगार यांनी केले आहे. या पदासाठी मुलाखत, निवड प्रक्रिया आणि इतर अटींबाबत अधिक माहितीसाठी कंपनीच्या ९४३६०६६४९३ आणि ९६६५०१५१३५ या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा.









Leave a Reply