एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती


0
Views

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात

३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

अर्ज नोंदणीची अंतिम मुदत १४ सप्टेंबर २०२६

राजकारण न्यूज डॉट कॉम

सोलापूर, दि. ३१ –

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागात शिकाऊ उमेदवार भरती २०२६-२७ अंतर्गत एक वर्षाच्या कालावधीसाठी एकूण ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक अमोल चंदकांत गोंजारी यांनी दिली.

 

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर MSRTC Solapur Division या आस्थापनेसाठी रजिस्ट्रेशन क्र. E09162700889 वर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणीची अंतिम मुदत १४ सप्टेंबर २०२६ पर्यंत आहे. भरतीबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी विभागीय कार्यालय, १९० बुधवार पेठ, सोलापूर-४१३००२ येथे संपर्क साधावा, असे आवाहन विभाग नियंत्रक अमोल चंदकांत गोंजारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *